April 27, 2024

Marathi

थेट बातम्या आणि नवीनतम अद्यतने

  • शिरूर मतदारसंघात 11 जणांचे उमेदवारी अर्ज बाद; पुण्यात 42 जणांचे उमेदवारी अर्ज वैध
    on April 27, 2024 at 6:01 am

    पुणे लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व 42 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये वैध ठरले आहेत. शिरूरमध्ये ४६ पैकी ११ उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून, यामध्ये बहुतांश अपक्ष मित्रांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज यांची छाननी आज पुणे मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुहास दिवसे यांनी केली. यामध्ये एक अर्ज बाद झाला; परंतु त्या उमेदवाराचा दुसरा अर्ज वैध ठरल्याने त्याची उमेदवारी

  • मिंधे गटाच्या खासदाराचा डाव फेल; वाघेरे-पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एकाचा अर्ज बाद
    on April 27, 2024 at 5:58 am

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेले नाशिक येथून आणून संजय वाघेरे आणि उरण येथील संजोग रवींद्र पाटील यांना मिंधे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास भाग पाडले. पाटील यांचा अर्ज भरताना तर मिंध्यांच्या खासदाराच्या जवळच्या दोन व्यक्ती उपस्थित होत्या. त्यापैकी एकाच्या खिशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • ‘एक्स’ डाऊन; युजर्सना मनस्ताप
    on April 27, 2024 at 5:57 am

    सोशल मीडिया ‘एक्स’ प्लॅटफॉर्म शुक्रवारी दुपारी डाऊन झाले. वेब आणि अॅप या दोन्ही व्हर्जनवर ‘एक्स’ सुरू होत नव्हते. हिंदुस्थानातील काही युजर्सला हा त्रास झाला. काही जणांनी ‘एक्स’च्या वापरामध्ये अडचणी येत असल्याचा रिपोर्ट केला, तर अनेकांनी काहीच त्रास नसल्याचे सांगितले. डाऊनडिटेक्टरच्या मते, 57 टक्के लोकांना सर्व्हर कनेक्शनमुळे तर 36 टक्के युजर्सनी ‘एक्स’ अॅपच्या समस्येबद्दल सांगितले.

  • पालघरच्या मच्छीमाराचा पाकिस्तानात मृत्यू
    on April 27, 2024 at 5:52 am

    पाकिस्तानी जेलमध्ये बंद असलेल्या पालघर येथील विनोद लक्ष्मण कोल (45) यांचा मृत्यू झाला आहे. कोल यांचा 17 मार्चला मृत्यू झाला आहे. विनोद पोल हे डहाणू येथील रहिवासी आहेत. त्यांचा मृतदेह पाकिस्तानातून डहाणूला 29 एप्रिलला पोहोचण्याची शक्यता आहे. विनोद हे गुजरातमधील नोंदणीकृत मासेमारी करणाऱया नावेवर काम करत होते. चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यानंतर त्यांना दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानी

  • तेलंगणात सात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
    on April 27, 2024 at 5:50 am

      तेलंगणातील 12 वी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या 30 तासांत राज्यातील सात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करणाऱयांमध्ये सहा मुलींचा समावेश आहे. हैदराबादच्या राजेंद्रनगर, खम्मम, मेहबुबाबाद, कोल्लूर या जिह्यांतील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. पास होवो की नापास, परंतु विद्यार्थ्यांनी आत्महत्या करू नये, असे वारंवार शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.    

  • अर्धवट मेट्रो प्रकल्प म्हणजे पांढरा हत्ती; सिटीजन फोरमकडून जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध
    on April 27, 2024 at 5:30 am

    पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत मेट्रो सुरू झाली असली, तरी मेट्रो स्थानकांवर वाहनांच्या पार्किंगसाठी जागा नाही. सल्ल्याने पार्किंगची सोय करावी. मेट्रोची फिडर सेवा सक्षम करावी, अर्धवट मेट्रो म्हणजे पांढरा हत्ती पाळण्यासारखे आहे. निवडून येणाऱ्या उमेदवाराने जनसंवाद सभा घ्याव्यात, कचरा व्यवस्थापनासाठी धोरण राबवावे, केवळ स्मार्ट सिटीच्या मागे न लागता शहरे राहण्याजोगी असायला हवीत, यांसह विविध मागण्यांचा

  • घरी बसून टिप्पणी करू नका, मतदान करा!
    on April 27, 2024 at 5:14 am

    देशात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांमधील 88 जागांवर आज मतदान झाले. बंगळुरूमध्ये राज्यसभा खासदार आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी मतदान केले. मतदानानंतर त्यांनी युवा वर्गाला मतदान करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, युवकांनी घरी बसून राजकीय टीकाटिप्पणी करू नये. त्यांनी बाहेर पडावे आणि मतदान करून स्वतःच्या नेत्यांची निवड करावी.

  • स्पायडरमॅनला स्टंट पडला महागात
    on April 27, 2024 at 4:30 am

      दिल्लीच्या रस्त्यावर बाईकवरून स्टंट करणे स्पायडरमॅनला महागात पडले. स्टंट करताना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. यात एक मुलगा आणि एका तरुणीचा समावेश आहे. हे दोघेही रील बनवण्यासाठी बाईकवरून स्टंट करत होते. या दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. त्यांच्या बाईकला नंबर प्लेट नव्हते. तसेच आरसेसुद्धा नव्हते. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे वाहन

  • महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा; देशात अनेक जागांवर जातींमध्ये लढाई
    on April 27, 2024 at 4:15 am

    या वेळच्या लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरणे निवडणुकीचा डाव पलटू शकणार आहेत. कारण देशभरात अनेक जागांवर उमेदवारांमध्ये नाही तर जातींमध्ये चुरशीची लढाई होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असे चित्र उभे राहिले आहे. खासकरून या वेळी बीडमधील निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनू शकतो. बीडमध्ये लोकसभा मतदारसंघात भाजपा नेते आणि माजी दिवंगत मंत्री गोपीनाथ मुंडे

  • भाजपच्या गोदामात सगळे भ्रष्टाचारी आणि माफिया; अखिलेश यादव यांचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला
    on April 27, 2024 at 4:00 am

    लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव कनौज येथून मैदानात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली असून पक्ष सोडून भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांवर आणि एनडीएवर घणाघाती टीकास्त्र सोडले. भाजपच्या गोदामात आता सगळे भ्रष्टाचारी आणि माफिया भरलेत असा हल्ला त्यांनी मोदी सरकारवर चढवला आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांच्या सभेचे

ताज्या बातम्या, खेळ, टीव्ही, रेडिओ आणि बरेच काही. आईओबी न्यूज नेटवर्क आंतरराष्ट्रीय ते राष्ट्रीय बातम्या, राजकीय ते सामाजिक, संरक्षण ते चालू घडामोडी, तांत्रिक बातम्या ते मनोरंजन बातम्या, प्रत्येक बातम्यांचे कव्हरेज निष्पक्ष, बौद्धिकदृष्ट्या विश्लेषित, विश्वासार्ह आणि विश्वासार्ह आहे.आईओबी न्यूज नेटवर्क माहिती देते, शिक्षित करते आणि मनोरंजन करते – तुम्ही कुठेही असाल, तुमचे वय काहीही असो.